Weather Alert | महाराष्ट्र मध्ये पावसाने हाहाकार माजवला असताना पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने मोठी अपडेट दिलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप चिंताजनक बातमी समोर आलेली आहे. आधीच झालेल्या पावसाने हातात तोंडाशी आलेला घास संपूर्ण हैरऊन घेतला, त्यातच पुन्हा उरलेसरलेलं पीक पण व्हायला जाणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. Weather Alert
अशातच हवामान खात्याने 24 सप्टेंबर रोजी राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. राज्यातील तब्बल १९ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, कोकणापासून मराठवाड्यापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र पासून विदर्भापर्यंत या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी, नागरिक आणि प्रवाशांनी सावध राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
कोकणातील या भागात पावसाचे सरी कोसळत आहेत. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडणार यांनी छत्री रेनकोट असे सोय करून बाहेर पडावे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील हवामान स्थिर राहील. विशेषता घाटमाथांवर ढगांचा जोर जास्त असल्याने अचानक पावसाच्या सरी येऊ शकतात. गेल्या काही दिवसांमध्ये शेतकरी शेतात कापूस, सोयाबीन, मका या पिकांची काळजी घेत आहेत, पण पावसाच्या अनियमित्तापानामुळे उभ्या पिकांवरती धोका निर्माण झालेला आहे. विजांच्या जोरदार फटक्यामुळे रात्रंदिवस शेतकरी बांधावर ते सावधपणे उभा राहत आहेत.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. इथे वारांसह पावसाचा इशारा आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आधीच दुष्काळाची परिस्थिती भेडसावत असलेल्या मराठवाड्यामध्ये या सरींमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी आशा दिसत आहे, पण जास्त वारांसह पाऊस आला तर काढणीला आलेल्या पिकांना देखील फटका बसू शकतो.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये हवामान स्थिर राहील. नाशिक घाटमात्यांवर विजांचा चा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव परिसरामध्ये केळीच्या बागा मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना वादळी वाऱ्याची भीती वाटते.
विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा आणि वाशिम मध्ये पावसाची शक्यता नाही असे सांगण्यात आला आहे पण अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर गडचिरोली आणि गोंदिया येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे. या भागात आधीच नद्यांना पूर आला होता, यामुळे लोकांना नवीन चिंतेत टाकणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
हवामान खात्याचा नवीन अंदाज शेतकरी बांधवांसाठी आणि नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे हवामान खात्याचा अंदाज आणि जिल्हा प्रशासनाचे आदेश पाळणे गरजेचे आहे. तसेच कुठे जर आवश्यक गरज भासल्यास लवकरात लवकर मदतीसाठी प्रयत्न करा.
