Post Office MIS : आजच्या महागाईच्या काळात घरखर्च सांभाळणं किती कठीण झालंय हे आपण सगळेच अनुभवतो आहोत. दूध, भाजी, पेट्रोलपासून मुलांच्या शाळेच्या फीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढलाय. अशावेळी प्रत्येकाला वाटतं की महिन्याला काहीतरी निश्चित उत्पन्न मिळालं पाहिजे, ज्यामुळे खर्च सुरळीत होतील. याचसाठी पोस्ट ऑफिसची एक भन्नाट योजना आहे मासिक उत्पन्न योजना (Post Office MIS).
काय आहे ही योजना?
पोस्ट ऑफिसची ही योजना साधी आहे आणि धोकामुक्त आहे. तुम्ही एकदा ठराविक रक्कम गुंतवली की त्यावर तुम्हाला दर महिन्याला व्याजाच्या रूपाने पैसे मिळतात. म्हणजेच नोकरीतून पगार मिळतो तसं, पण इथे सरकारकडून हमीशीर परतावा मिळतो.
वैशिष्ट्यं एकदम खास
व्याजदर सध्या या योजनेत वार्षिक 7.4% व्याज दिलं जातं. किमान गुंतवणूक फक्त ₹1000 पासून खाते उघडता येतं. कमाल गुंतवणूक एका व्यक्तीच्या नावावर ₹9 लाख, तर संयुक्त खात्यात ₹15 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.
पत्नीच्या नावावर खातं आणि फायदा
जर तुम्ही पत्नीच्या नावावर किंवा दोघांनी मिळून संयुक्त खाते उघडलं आणि त्यात ₹15 लाख गुंतवले, तर दरमहा थेट ₹9250 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. म्हणजे बघा, एक वेगळा महिन्याचा पगारच हातात मिळाला.
कालावधी आणि परतावा
ही योजना ५ वर्षांसाठी असते. त्या कालावधीच्या शेवटी तुम्हाला मूळ रक्कम तशीच परत मिळते. म्हणजे व्याज वेगळं आणि मूळ वेगळं. त्यामुळे घराच्या भविष्यासाठी ही योजना एकदम टेन्शन-फ्री आहे.
खाते उघडण्यासाठी काय लागेल?
जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. बचत खाते असणं गरजेचं आहे. खातं एकट्याच्या नावावर किंवा २-३ जणांच्या संयुक्त नावावर उघडता येतं.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही व गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. )
