Maruti Price : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, मारुतीची ही गाडी झाली स्वस्त पाच लाखाहून आता मिळणार 3.5 लाखात

Maruti GST Price : देशामध्ये गाड्या घेणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण देशातील सर्वात जास्त विक्री करणारी कंपनी म्हणजे मारुती सुझुकीन मोठी घोषणा केलेली आहे. जर तुम्ही देखील गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे बजेट नसेल तरी बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण आता तुमच्या बजेटमध्ये परवडणारे आणि दमदार फीचर्स असणारी गाडी एकदम स्वस्त झालेली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जीएसटी दरात झालेल्या बदलाचा थेट परिणाम आता ग्राहकांपर्यंत पोहोचणार असून, मारुतीच्या लोकप्रिय गाड्या तब्बल लाखभर स्वस्त झालेल्या आहेत. Maruti GST Price


सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सध्या मध्यमवर्गीय माणूस ज्यांचे नेहमी स्वप्न असतं की, आपल्याही घरासमोर एक नवीन चमचमीत कार उभी राहावी ते आता सहज पूर्ण होणार आहे.

नुकताच झालेल्या जीएसटी सुधारणामुळे मारुती सुझुकीने आपल्या अनेक मॉडेल्सच्या किमती कमी केल्याचं जाहीर केल आहे. कंपनीला सांगितलं की, छोट्या कुटुंबासाठी खास डिझाईन केलेल्या S- Presso आता केवळ 3.50 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. आधी जी गाडी थोडीशी महाग वाटायची, ती आता जवळपास एक लाख तीस हजार रुपयांनी स्वस्त झाल्याने हजारो ग्राहकांसाठी ही एक बातमी सुखद ठरली आहे.

फक्त S – Presso नाहीतर देशभरातील धडाकेबाज विक्री करणारी व्हॅगनार, अल्टो आणि इंगीनस या गाड्यांच्या किमतीत मोठी घट करण्यात आली आहे. साधारण एक लाख 29 हजार रुपयांनी या गाड्या स्वस्त झाल्या आहेत आणि या नवीन किमती 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहे. म्हणजेच येत्या सणसुदीच्या दिवसात कार खरेदी करायची असेल तर ग्राहकांना जास्त विचार करण्याची गरज नाही.

मारुती सुझुकीच्या मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने जीएसटी कमी केल्यानंतर त्याचा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्णय आहे. गाड्या जरी स्वस्त झाले असल्या तरी त्यातला दर्जा, पिक्चर्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये अजिबात बदल झालेला नाही. म्हणजेच कमी किमतीत ही तितकीच मजबूत सुरक्षित आणि आधुनिक कार ग्राहकांना मिळणार आहे.

मध्यमवर्गीय कुटुंब जे वर्ष नव वर्ष असे साठवून एक कार घेण्याचा स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी जणू दिवाळीचा बोनसच आहे. गावाकडच्या शेतकऱ्यांपासून शहरातील नोकरदारांसाठी आता एक नवं स्वप्न पूर्ण होणार आहे.

Leave a Comment