Maharashtra Weather Forecast | सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाचे वातावरण तयार झालेले आहे आणि याच पावसाने अनेक शेतीचे आणि शहरी भागाची, ग्रामीण भागातील वस्तीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहेत. राज्यामध्ये जून जुलैपासूनच राज्यभर पावसाने धुमाकूळ घातला होता. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये आशेच स्वप्न होतं, परंतु पीक चांगला आल आणि पावसाची सुरुवात झाली हा नुसता पाऊस नसून अतिवृष्टी सारखा पाऊस झालेला आहे. यामुळे आलेले पीक देखील वाहून गेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे कसे जगावे असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. Maharashtra Weather Forecast
परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमी वरती हवामान खात्याने पुन्हा एकदा नवा अंदाज वर्तवलेला आहे आणि हा हवामान अंदाज शेतकऱ्यांच्या मनामध्ये धडकी भरवणारा आहे. 15 ऑक्टोबर पासून मान्सून परतेल, अस सांगण्यात आलय. परंतु तो परतायच्या आधी अजून एकदा जोरदार दणका शेतकऱ्यांना देणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांसाठी हा हवामान अंदाज खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
राज्यामध्ये 24 ते 27 सप्टेंबर पर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ओडिसा, आंध्र प्रदेश, झारखंड बरोबर महाराष्ट्रात देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानंतर पष्ट सांगितला आहे की विदर्भात ढगाळ वातावरण राहणार, तर मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढेल. आधीच नापिकाने खचलेला शेतकरी या नव्या संकटाच्या सहावाटाखाली अजून काळजीत पडलाय.
मराठवाड्यात तर शेतकऱ्यांनी कर्ज काढून लावलेली पिकं पुन्हा पाण्यामध्ये जाण्याची भीती आहे. अहो पेरलं ते उगवलं उगवलं ते वाहून गेला आता पुन्हा जर पाऊस आला तर आमचं भविष्याचं काय? असा प्रश्न अनेक शेतकरी विचारत आहेत आणि त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू थांबता थांबेनात.
पावसाचा जोर वाढल्यास नदी नाले खळखळून वाहतील, धरण भरून वाहू लागतील, आणि खालच्या गावांना पुराचा धोका निर्माण होईल. गेलं काही दिवसांमध्ये ज्यांनी घर गमावली, ज्यांच्या पिकांवरती पाणी आलं, त्यांच्यासाठी हा इशारा म्हणजे आणखी एक मोठे नवीन संकटच.
हवामान खात्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील सावध राहण्याच आव्हान केला आहे. या पार्श्वभूमी वरती सुरक्षित ठिकाणी राहण्याची, नवीन नाल्यांच्या काठावर जाण टाळण्याची सूचना दिली गेली आहे. पण खरी समस्या आहे किती शेतकऱ्यांची. कर्ज, विमा, बियाणं, खत आणि पीक या सगळ्यांचे गणित बिघडला आहे आणि त्यांनी दिवाळी कशी करायची हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे.
