LPG gas cylinder rate : सध्या देशभरामध्ये महागाईचा भडका उडालेला आहे आणि दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेले आहे अशा मध्ये सर्वसामान्यांना घर चालवणे अवघड होत चाललेला आहे अशाच परिस्थितीमध्ये सरकारने घेतलेले आहे का निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तो म्हणजे केंद्र सरकारने जीएसटी मध्ये कपात केलेली आहे यामुळे अनेक दैनंदिन गरजांवरती फायदा होणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घरामध्ये दररोज वापरात येणारा गॅस सिलेंडरच्या दरात कपात होणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. LPG Gas Cylinder rate
वाढत्या महागाईच्या काळामध्ये गॅस सेंटरचे दर कमी होतील का अशी अपेक्षा प्रत्येक सामान्य माणसांना होती. ३ सप्टेंबरला जीएसटी परिषदेची मोठी बैठक झाली आणि त्यामध्ये अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 22 सप्टेंबर पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की गॅस सेंटरच्या दर कमी होणार का?
परिषदेच्या निर्णयानुसार 12% आणि 28% जीएसटी चे स्लॅब संपवले गेले आहे. आता फक्त पाच टक्के आणि 18% असे दोनच स्लॅब उरले आहेत. दैनंदिन वापराच्या वस्तू, कपडे, अन्नधान्य, कृषी साहित्य, गाड्या इलेक्ट्रॉनिक्स यांच्यावरचा जीएसटी कमी करण्यात आला आहे. म्हणजे अनेक वस्तू 22 तारखेपासून स्वस्त होणार आहेत मात्र यामध्ये गॅस सिलेंडरचा समावेश नाही.
सरकारचा नवीन निर्णय काय?
एलपीजी सिलेंडरवर सरकार वेगवेगळ्या प्रकारचा जीएसटी आकारते. घरगुती सिलेंडरवर फक्त पाच टक्के जीएसटी आहे. तर हॉटेल रेस्टॉरंट मध्ये लागणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरवर तब्बल 18% जीएसटी आहे. या आजारांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे घरगुती सिलेंडर असो किंवा व्यावसायिक, दरात काही फरक पडणार नाही. 22 सप्टेंबर नंतर गॅस सिलेंडर ज्या भावात मिळत होता त्याच भावात मिळणार आहे हे देखील सर्वसामान्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
2017 मध्ये देशभरात जीएसटी लागू झाली आणि त्यानंतर प्रत्येक परिषदेच्या बैठकीत दरवेळी काही ना काही बदल होत आले. यावेळीही अनेक गरजेच्या वस्तूंवर जीएसटी कमी केल्याने घरगुती बजेटला दिलासा मिळणार आहे. पण गॅस सिलेंडरवरील भार मात्र तसंच राहणार आहे.
आजच्या महागाईच्या काळात एक सिलेंडर भरण्यासाठी लोकांना 900 ते हजार रुपये मोजावे लागतात. ग्रामीण भागात अजून देखले आणि कुटुंबांकडे महागड्या गॅस एवजी शेगडी लाकूड वापरतात. कारण महिन्याला दोन सिलेंडर घ्यायचे म्हणजे चार-पाच हजार रुपये खर्च होतो. जीएसटीच्या नव्या निर्णयातून सिलेंडरचा दर कमी झाला नाही, त्यामुळे स्वयंपाक घराच्या खर्चात दिलासा मिळेल अशी जी अपेक्षा होती ती अपुरीच राहिली आहे.
दुसरीकडे तंबाखू, शीतपेये, सुपर लक्झरी कार यावर मात्र 40% पेक्षा जास्त जीएसटी कायम आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यावर मोठा कर आणि गरीब श्रीमंत सगळ्यांच्या स्वयंपाक घराशी संबंधित गॅस सिलेंडर मात्र त्याच भावात मिळणार आहे. त्यामुळे जीएसटीच्या या नव्या निर्णयात सामान्य माणसाला थेट गॅस सेंटरमध्ये काहीही फायदा होणार नाही हे स्पष्ट झालेले आहे.
