नवरात्रात सोन्याचे दर बदलले, महाराष्ट्रातील नवीन दर पाहून सर्वसामान्यांच्या हाताबाहेर सोने

Gold Rate Today | सणासुदीचा काळ सुरू झालेला आहे. यातच महत्त्वाचा म्हणजे नवरात्र उत्सव हा उत्सव घराघरांमध्ये आनंदाचा आणि सर्वत्र उत्सव सुरू असतो. बाजारपेठेमध्ये गर्दी वाढणार, आणि लोक सणासुदीनिमित्त सोन आणि चांदी खरेदी करण्याची वाट पाहणार. पण एक गोष्ट सांगू इच्छितो जर तुम्ही सोन चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्रातील सराफ बाजारातून एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसणार आहे. Gold Rate Today


आज सकाळी सोन्याच्या दरात तब्बल मोठी वाढ झालेली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, ठाणे या शहरात 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,08,990 प्रति दहा ग्रॅम इतका झाला. 22 कॅरेट सोने ₹1,03,800 तर 18 कॅरेट सोन थोडं पडवणार दरात मिळतंय. इतक्या झपाट्याने दर वाढत असल्याने अनेक कुटुंबामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोणाला वाटते आता खरेदी करून टाकू, काही लोक म्हणताय थोड थांबायला हवं.

गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत सतत घसरत दिसली आहे. बाजारातील जानकर सांगतात की, जर ही घसरण अशीच सुरू राहिली तर सोन्याचा भाव पुढच्या काही दिवसांमध्ये ₹95,000 प्रतिदहा ग्रॅम पर्यंत खाली येऊ शकते. अशा अंदाजामुळे लोकांची मन विचलित झाले आहे. कारण ज्यांना लग्न समारंभासाठी सोनं खरेदी करायचा आहे ते वाट पाहून लगेच खरेदी करू का? या प्रश्नात अडकले आहेत.

नवरात्र मध्ये शुभ सणात सोन खरेदी करावी का असा देखील प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. दररोज भाव बदलत असल्याने लोक सराफ दुकानात दर पुन्हा पुन्हा विचारत आहे. गावात तर लोक म्हणताय, सोने घेताना आता सोन्याचं वजन कमी जास्त होतं की काय, इतका भाव चढतोय उतरतोय.

खरंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डॉलरचे दर बदलत आहेत मध्य पूर्वेतील तनाव यामुळे सोन्याच्या किमतीत चढउतार सुरू आहे. पण सामान्य नागरिकांना एवढं काही कळत नाही, त्याला तर फक्त एवढच दिसते की काल किंवा आज जास्त आहे किंवा कमी. त्यामुळे सध्या सर्व बाजारात चर्चेला एकच विषय आहे सोन्याचा दर.

Leave a Comment