Bank of Maharashtra Generalist Officer Recruitment 2025 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रकडून जनरलिस्ट ऑफिसर (स्केल-II) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. या भरतीद्वारे एकूण 500 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी उशीर न करता लगेच अर्ज करावा. Bank of Maharashtra Generalist Officer Recruitment 2025
अर्ज करण्याची प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी बँकेची अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in येथे भेट द्यावी लागेल.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी (Graduation) किंवा इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री
सर्व सेमिस्टर/वर्षांमध्ये मिळून किमान 60% गुण (SC/ST/OBC/PwBD उमेदवारांसाठी 55%) आवश्यक
किंवा उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट (CA) असावा.
वयोमर्यादा
अर्जदाराचे वय किमान 22 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयात सवलत मिळणार आहे.
उमेदवारांचे वय 31 जुलै 2025 रोजीच्या तारखेवर आधारित मोजले जाईल.
पगारमान
या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन मिळेल :
₹ 64,820 – 2,340/1 – 67,160 – 2,680/10 – 93,960 (स्केल-II).
अर्ज शुल्क
General/OBC/EWS उमेदवारांसाठी : ₹1180
SC/ST/PwBD उमेदवारांसाठी : ₹118
महत्वाच्या सूचना
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना (Official Notification) नीट वाचावी.
आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा यांची खात्री करून मगच अर्ज करावा.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे.
