या तीन नवीन 3 इलेक्ट्रिक SUV कार भारतात घालणार धुमाकूळ, कंपनीची जोरदार तयारी सुरू

New electric car : भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक गाड्यांचा बाजार झपाट्याने वाढत चाललेला आहे. सुरज्या लोकांचा कल थोडासा संकोचलेला होता, पण आता पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आणि सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीमुळे लोक सर्रासपणे इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करतात. त्यात SUV गाड्यांना लोकांचा नेहमी कल असतोच. त्यामुळे आता कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV या सेगमेंट मध्ये कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरू झाली आहे. टाटा नेक्सन EV, महिंद्राची XUV 400 आणि MG च्या EV गाड्या आधीपासूनच बाजारात आहेतच. पण याच्या दोन-तीन वर्षात या सेगमेंट मध्ये आणखी नवीन मॉडेल येणार आहेत आणि ती थेट Hyundai, Kia आणि Mahindra सारख्या दिग्गज कंपन्यांकडून, चला तर जाणून घेऊया या नवीन तीन कार बद्दल माहिती. New electric car


1) kia Syros Ev

किया कंपनी भारतात 2026 च्या पहिल्या तीमाहित आपली नवीन कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV आणणार आहेत. kia Syros Ev असं या गाडीचं नाव ठेवण्यात आल आहे. नुकतीची गाडी कुर्यामध्ये चार्जिंग स्टेशनवर दिसली असून तिच्या प्रीमियम फीचर्स बद्दल जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.

यामध्ये लेवल – 2 ADAS, व्हेटीलेटेड सीट्स, पेनोरॉमीक सनरूफ, दोन 12.3 इंच स्क्रीन असे हायटेक फीचर्स असतील. बॅटरी बाबत अद्याप अधिकृत माहिती नाही, पण Hyundai च्या Inster EV प्रमाणे यामध्ये 42kWh आणि 49kWH बॅटरीचे पर्याय असतील, जमल गाडीची रेंज अनुक्रमे 300 किमी ते 355 की मी इतका असू शकतो.

2) Mahindra XUV 3XO EV

महिंद्रा ने आधीपासूनच इलेक्ट्रिक SUV सेगमेंट मध्ये जोरदार पकड घेतली आहे. XUV 400 नंतर कंपनी आता आणखी परवडणारी SUV बाजारात आणणार आहे. Mahindra XUV 3XO Ev. ही गाडी XUV 3XO च इलेक्ट्रिक व्हर्जन असेल.

2026 च्या सुरुवातीला ही गाडी बाजारातील अशी माहिती समोर येते. यात ICE व्हर्जन सारखेच प्रीमियम फीचर्स मिळतात जसं की, पॅनोरमिक सनरूप, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 12.3 इंच टच स्क्रीन, लेवल 2 ADAS आणि हार्मन कर्डन साऊंड सिस्टिम. बॅटरी बाबत बोलायचं झाल तर या SUV मध्ये 35kWh क्षमतेची बॅटरी असेल जी एका चार्जमध्ये सुमारे 400 किमी रेंज देईल.

3) Hyundai ची नवी EV SUV

Hyundai कंपनीने नुकत्याच झालेल्या Investor Day मध्ये आपली भारतासाठी नवीन EV स्टॅटरर्जी जाहीर केली आहे. Hyundai च लक्ष आता थेट TATA Punch EV सारख्या छोट्या SUV वर आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या कंपॅक्ट SUV चे डायमेन्शन सध्याच्या Hyundai Exter सारखेच असतील असं बोललं जातंय.

ही गाडी Hyundai च्या चेन्नई प्लांट मध्ये तयार होईल. फीचर्स बाबत आणि बॅटरी बाबत अधिकृत माहिती नसली तरी अपेक्षित आहे की Inster EV सारखेच 42kWh आणि 49 KWh बॅटरीचे पर्याय यामध्ये मिळतील. त्यामुळे गाडीचा रेंज 300 किमी पेक्षा जास्त असणार आहे.

Leave a Comment