Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, या चार जिल्ह्यांना अलर्ट जारी वाचा सविस्तर माहिती

Weather Alert | गेले अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने आपल्या जोरदार आगमन दाखवायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचे पिकांच अतोनात नुकसान झालेली आहे, परंतु आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कुठेतरी दिलासा मिळतोय. परंतु आज शनिवार हवामान खात्याने पुन्हा एकदा इशारा दिला असून महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती. Weather Alert


राज्यातील पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये गेल्या 24 तासात तब्बल 97.4 मिलिमीटर पाऊस झाला. रस्ते ओले चिंब, तर नाल्यांना पाणी साचून अनेक भागात रहदारीला अडथळा निर्माण झाला. आज शनिवारी ही पुण्यात ढगाळ वातावरण राहून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट सारख्या सोयीसुविधा बाळगणे आवश्यक आहे.

सातारा मध्ये देखील गुरुवारी कमी पाऊस झाला होता पण आज हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज उर्तवला आहे. 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून शेतकरी बांधवांनी शेतातील कापणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे असं हवामान खात्याकडून सांगण्यात आल आहे.

तर कोल्हापुरामध्ये 24 तासात 34 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर कोल्हापुरात वातावरण थंडगार झालं होतं. आज देखील आकाश ढगाळ राहून कुठेतरी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. वारंवार होणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांमध्ये पाणी वाढण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जात आहे.

सोलापूरमध्ये पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी पुढील पाच तासात पावसाचा जोर वाढू शकतो. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करताना जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा सल्ला देण्यात आलेला आहे.

सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाची उघडीप होती. उन्हाच्या चटक्यामुळे तापमान वाढलं होतं. पण आज शनिवारी ढगाळ वातावरण राहून एक दोन ठिकाणी जोरदार सरी येऊ शकतात. त्यामुळे शेतातील कामे करताना शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेतला पाहिजे.

तर असा आहे हवामान खात्याचा सविस्तर अंदाज आपण पाहिले की राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. या काळात नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

Leave a Comment