Greaves Electric : देशात गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. त्यामध्ये महागाई, प्रदूषण आणि इंधन खर्च यामुळे आता अनेक कुटुंब इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. शहरात असो या गावात लोकांना इलेक्ट्रिक स्कूटर ही चांगली आणि परवडणारी सोय वाटू लागली आहे. अशावेळी Greaves Electric Mobility कंपनीने आपल्या नवी इलेक्ट्रिकल स्कूटर Ampere Magnus Grand भारतीय बाजारामध्ये लॉन्च केलेली आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर स्टाईल आणि कॉन्फर्टच नाही तर सुरक्षिता आणि टिकाऊ पणामध्ये देखील नवा बेंच मार्क तयार करणार आहे. Greaves Electric
किंमत काय आहे ?
Ampere Magnus Grand या इलेक्ट्रिकल स्कूटर ची किंमत कंपनीने 89,999 रुपये ( x शोरूम) इतकी ठेवली आहे. म्हणजे जवळपास 9000 रुपयांच्या आत ग्राहकांना ही स्कूटर उपलब्ध होणार आहे. पेट्रोल स्कूटरच्या रोजच्या खर्चाची तुलना केली तर दीर्घकाळ वापरात ही स्कूटर ग्राहकांसाठी परडवणारी ठरणार आहे.
स्कूटरचे नवे डिझाईन
ही स्कूटर कंपनीच्या Ampere Magnus Neo या आधीच्या मॉडेलवर आधारित आहे. तिचा डिझाईन जवळपास सारखा असलं तरी Magnus Grand मध्ये कंपनीने काही नवीन बदल केलेले आहेत. ही स्कूटर दोन आकर्षक ड्युअल टोन रंगांमध्ये मिळते. MATCHA GREEN आणि Ocean Blue. दिसायला आकर्षक करण्यासाठी कंपनीने मजबूत ग्रॅब रेल, अधिक स्पेस असलेली सीट आणि जास्त वजन वाहून नेणारी क्षमता दिली आहे.
बॅटरी व रेंज
कंपनीच्या Ampere Magnus Neo मध्ये 2.3 kWh LFP बॅटरी दिलेली होती, जीए का चार्जर जवळपास 95 किमी (इको मोडमध्ये) चालत होती. Magnus Grand मध्ये याच बॅटरी सेटअप सोबत आणखी मजबूत आणि अपडेट ब्रेकिंग टेक्नॉलॉजी मिळणार आहे. म्हणजेच ही स्कूटर दैनंदिन प्रवासासाठी आणि शहरात सहज वापरासाठी योग्य आहे.
कंपनीचा म्हणणं काय?
Greaves Electric Mobility चे मॅनेजिंग डायरेक्टर विकास सिंग यांनी लॉन्चिंग वेळी सांगितले Ampere Magnus Grand मध्ये आम्ही काही टेक्नॉलॉजी आणि डिझाइन यांचा उत्तम संगम घडून आणलेला आहे. ही स्कूटर्स शहरात अधिक आरामदायिक आणि सुरक्षित असेल. तुमचा प्रयत्न आहे की ग्राहकांना चांगल्या किमतीत उत्तम इलेक्ट्रिक Mobility मिळावी.
Greaves Electric Mobility च्या पोर्टफोलिओमध्ये याआधीही काही इलेक्ट्रिकल स्कूटर होत्या. त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे ‘Ampere Nexus. या स्कूटरमध्ये 3kWh बॅटरी आहे आणि ती एकर चार्जवर तब्बल 136 किमी धावते. फक्त साडेतीन तासात ही बॅटरी पूर्ण चार्ज होते. चार वेगवेगळे राइड मोड्स, टॉप स्पीड 93kMph मजबूत चेसीस आणि डायमंड कट एलईडी हेडलाईन यामुळे Nexus हा हाय परफॉर्मन्स स्कूटर सेगमेंट मध्ये ओला इलेक्ट्रिकल S1 air, TVS IQUBE आणि Ather 450S ला टक्कर देतो.
