Maharashtra Weather Update : महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतात पाणी शिरल्याने उभ पीक नाहीसे झाल आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान (IMD) खात्याने राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सावध रहावे आणि हवामान खात्याच्या अपडेट कडे लक्ष ठेवा.
हवामान खात्याने दिलेल्या नवीन अंदाजानुसार, मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून पुढचे दोन दिवस म्हणजे 48 तासात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार आहे. या पार्श्वभूमी वरती छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा म्हटल आहे. घाटमाथ्यावरती तर वाऱ्यांचा वेग 40 किलोमीटर प्रति तास इतका राहणार आहे. Maharashtra Weather Update
कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर मुंबई, ठाणे या भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील. तर विदर्भात अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर सह अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर आज वाढणार आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे अधिकच नुकसान झालेले आहे यामुळे शेतकऱ्यांमधून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवरती अहिल्या नगर जिल्ह्यातील शेतीचे तर मोठ्या नुकसान झालेला आहे. सोयाबीन च पीक जवळपास उध्वस्त झाला असून, कांद्याचा साठा पाण्यात बुडून गेला आहे. आधीच कांद्याला भाव नाही, त्यामध्ये हा पाऊस, अनेक शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कांदा साठवून ठेवलेला आहे. पण मुसळधार पावसामुळे आत मध्ये पाणी शिरल्याने संपूर्ण साठा वाया गेलेला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचं केलेले कष्ट वाया गेलं आहे म्हणून शेतकऱ्यांच्या काळजामध्ये नुसती आग होत आहे. शेतकरी हातवर झालेला आहे यामुळे शासनाने देखील शेतकऱ्यांना मदत करणे गरजे.
आता शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने कधी मदत मिळते याकडे पाहण्यासारखे आहे तसेच शेतकऱ्यांमधून लवकरात लवकर मिळत मिळावी अशी देखील मागणी जोर धरू लागलेली. तसेच पुढील तीन दिवस पावसाचे असणार असल्याने प्रशासनन नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय. अनावश्यक बाहेर पडू नये, नदीजवळ किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कुठल्याही मोठ पाऊल उचलू नये.

1 thought on “महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती पहा!”