Mahendra New Thar : गेल्या काही वर्षांमध्ये महिंद्राची थार ही फक्त एक गाडी नाही तर तरुणांच्या मनामध्ये एक स्वप्न बनला आहे. 2020 मध्ये जेव्हा दुसऱ्या पिढीची थार बाजारात आली, तेव्हापासूनच शहरांमध्ये किंवा गावामध्ये चौकात दिसणारी ही दमदार गाडी लोकांच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. आधी २WD मॉडेल आणलं, नंतर पाच दरवाजांची थार रॉक्स बाजारामध्ये दाखल झाली आणि धडाकेबाज विक्री झाली. पण आता महिंद्रा ने पुन्हा डाव साधलाय 3 डोअर थार फेसलिफ्ट लॉन्च करायला सज्ज! Mahendra New Thar
या नव्या थारचे टेस्टिंग रस्त्यावरती सुरू आहे आणि कमोप्लेस मध्ये दिसणारे फोटो आधीच वायरल झालेले आहेत. दिसायलाही ठार एकदम तगडी दिसत आहे. फ्रेंड बंपर पुन्हा डिझाईन करण्यात आलंय, ग्रील थोडा बदललाय आणि C शेप LED लाइटिंग मिळणार आहे. म्हणजेच रात्री गाडी रस्त्यावरून आली तर लांबूनच नजरेत भासणार. नव्या अलॉय व्हील्समुळे तिचा रॉयल लूक आणखी उठून दिसणार आहे.
तसेच, इंजन मात्र तसेच ताकदीच राहणार आहे. 1.5 लिटर डिझेल, 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेल असे तीन पर्याय या फेसलिफ्ट थार मध्ये कायम ठेवण्यात येणार आहेत. म्हणजे गाडीचा दमदारपणा तसंच, पर लुक आणि फीचर्स मात्र झकास आणि नवीन.
आत मध्ये बदल जास्त दिसणार आहेत. 10.25 इंच टच स्क्रीन इनफोटोमेन्ट सिस्टीम थेट डॅशबोर्डवर येणार आहे. गिअर लिव्हरचा भाग नव्याने बनवला गेलाय, वायरलेस चार्जिंग पॅड येणार असल्याच्या चर्चाही आहेत. महेंद्रने नवो स्टेरिंग व्हील दिल आहे. पॉवर विंडोचे स्विच आता दरवाजा बाहेर शिफ्ट केले आहेत. म्हणजे आत बसल्यानंतर अनुभव एकदम प्रीमियम.
महिंद्राची ही गाडी काही दिवसातच बाजारामध्ये दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. महिंद्राच लक्ष फक्त ऑफ रोड गाडी देण्यात नाही, तर शेतकऱ्यांपासून ते शहरातील तरुणांपर्यंत प्रत्येकाला आपली जीवनशैली दाखवता यावी अशी SUV द्यायची आहे. जर तुम्ही देखील एखादी चांगली गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही गाडी नक्की खरेदी करा.
