दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट!

8th Pay Commission : सणासुदीच्या काळात घरात खर्च वाढतो. बाजारात गर्दी वाढते, कपडे, मिठाई, भेटवस्तू या साठी लोकांच्या खिशाला ताण येतो. अशावेळी जर सरकारकडून काही दिलासा मिळाला तर तो सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी आधार बनतो. यंदाच्या दिवाळीपूर्वी अशीच एक डबल गुड न्यूज येण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता ( DA) वाढवण्याचा निर्णय आणि 8 वा वेतन आयोग (8th Pay Commission) याबाबत हालचाली जोरात सुरू आहेत. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे. 8th Pay Commission


केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात सुधारणा करते. पहिला सुधारणा जानेवारी ते जून आणि दुसरी जुलै ते डिसेंबर या कालावधीत होते. यंदा मार्च महिन्यात DA 2% ने वाढवण्यात आला आणि तो 55% वर पोहोचला. आता जुलै डिसेंबर 2025 या कालावधीत आणखी 3% वाढवण्याची वाढवण्याची चर्चा सध्या आहे. जर हे लागू झाले, तर DA 58% होईल. साधा हिशोब लावला, तर 1 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शन धारकांना याचा थेट फायदा होणार आहे.

महागाई भत्त्याचा फायदा किती मोठा असतो, हे एका उदाहरणासह समजून घेऊया. समजा, एखाद्या पेन्शन धारकाची बेसिक पेन्शन 9,000 रुपये आहे. सध्या 55% DA नुसार त्यांना 4950 रुपये मिळतात, म्हणजे एकूण पेन्शन 13,950 रुपये होते. पण जर DA 58% झाला, तर 5220 रुपये मिळतील. म्हणजेच एकूण पेन्शन ₹14,220 रुपये होईल. यात जवळपास 270 रुपयांचा फरक पडेल. मोठी रक्कम वाटत नसली तरी महिन्याच्या खर्चात यामुळे थोडाफार दिलासा मिळतोच.

यासोबतच आठव्या वेतन आयोगाच्या बातम्यांनी कर्मचाऱ्यांना मध्ये एक नवीन उत्सुकता निर्माण झालेली. सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी आठवा वेतन आयोगाची स्थापना जाहीर केली होती. आता दिवाळीपूर्वी या आयोगाचे terms of Reference ठरवले जाऊ शकतात. म्हणजे आयोग कोणत्या मुद्द्यांवर काम करणार, अहवाल किती वेळात द्यायचा, शिफारशी कशा लागू करायचे हे सर्व स्पष्ट होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार यावेळेस अहवाल लवकर मिळावा यासाठी आठ महिन्यांची मुदत देण्याची शक्यता आहे. अशावेळी 1 जानेवारी 2026 पासून नवीन शिफारस लागू करता येतील.

दिवाळी हा भारतीय कुटुंबासाठी सर्वात मोठा सण असतो. घराची दुरुस्ती, नवीन कपडे, सोने चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सणासुदीचा बाजार यामुळे खर्च वाढतो. कर्मचारी वर्गाला वेतन आयोग आणि महागाई भत्त्याच्या वाढीमुळे जेवढं थोडं जरी अतिरिक्त मिळालं, तरी सण साजरा करताना मोठा हातभार लावणार आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीचा हा डबल दिलासा सामान्य माणसासाठी सोने पे सुगंध सारखा ठरणार आहे.

Leave a Comment